नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी प्रभात रंजन रुजू
By Admin | Published: June 13, 2015 02:28 AM2015-06-13T02:28:06+5:302015-06-13T02:28:06+5:30
पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले नवे आयुक्त प्रभात रंजन यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त के. एल. प्रसाद यांनी राजीनामा
नवी मुंबई : पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले नवे आयुक्त प्रभात रंजन यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त के. एल. प्रसाद यांनी राजीनामा दिल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते १३ वे आयुक्त आहेत.
निवृत्तीचा एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवे आयुक्त म्हणून प्रभात रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार रंजन यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे १३ वे आयुक्त आहेत. त्यांच्या स्वागतप्रसंगी मावळते आयुक्त के. एल. प्रसाद, अप्पर आयुक्त विजय चव्हाण तसेच सर्व उपआयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रसाद यांनी रंजन यांच्याकडे पदभार देत त्यांना शुभेच्छा दिल्या. के. एल. प्रसाद यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यावर अधिकाऱ्यांमार्फत योग्यरीत्या भर दिला होता. त्यामुळे येत्या काळात नवे आयुक्त प्रभात रंजन हे कशा प्रकारे आपल्या कामाची छाप उमटवतील याकडे पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)