एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:17 PM2024-07-29T21:17:20+5:302024-07-29T21:18:20+5:30
Pradeep Sharma wife Swikriti Sharma joins Shiv Sena: प्रदीप शर्मांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
Pradeep Sharma wife joins Shiv Sena: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे गेल्या काही कालावाधीपासून राजकारणापासून दूर आहेत. २०१९मध्ये प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता. आता प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा ( Swikriti Sharma ) यांनी राजकारणाची वाट धरली. मलबार हिल परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ( Eknath Shinde faction ) प्रवेश केला.
— Viru B (@ViruB1023220) July 29, 2024
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झाला. पतीने ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली असली तरी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कर्तव्यावर असताना २०१९ मध्ये राजीनामा देऊन प्रदीप शर्माने शिवबंधन हाती बांधले होते. त्यात त्यांचा पराभव झाला. नंतर अँटिलियासमोर मिळालेली स्फोटके असलेली कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएने २०२१ मध्ये शर्मा यांना अटक केली. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असताना फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारून कारवाई केल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली. अखेर आता त्यांच्या पत्नीने राजकारणात एन्ट्री घेत शिंदे गटात प्रवेश केला.