महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक
By Admin | Published: June 27, 2016 10:06 PM2016-06-27T22:06:26+5:302016-06-27T22:06:26+5:30
काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रज्ञा बडवाईक यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून
नागपूर : काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. प्रज्ञा बडवाईक यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून शांताबाई कुंबरे यांच्याकडे नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्यातील नेत्यांना लक्षणीय स्थान देण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नागपूरच्या कांता पराते, डॉ.रिचा जैन, ममता गेडाम तर नागपूर ग्रामीणच्या तक्षशिला वाघधरे यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नागपूर जिल्ह्यातूनच सर्वात जास्त निवड करण्यात आली आहे.
चिटणीसपदी नागपूर जिल्ह्यातून चार महिलांची निवड झाली आहे. यात नागपुरातीलच डॉ.रेखा विनय बारहाते, शिल्पा जावडे यांच्यासह नागपूर ग्रामीणच्या ज्योत्स्ना दिलीप कुमरे व वैशाली मानवतकर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये नागपूर ग्रामीणच्या ज्योती झोड यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ह्यएनजीओ सेलह्णच्या मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी नागपूरच्या प्रतिभा उके यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सल्लागार परिषदेत नागपूरच्या जयंती मुजुमदार यांचा समावेश करण्यात आला आहे.