प्रफुल्ल शिलेदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:58 AM2019-01-29T05:58:45+5:302019-01-29T05:58:58+5:30
अनुवादासाठी गौरव : हिंदी संशयात्मा काव्यसंग्रह मराठीत आणला
नवी दिल्ली : साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मान यंदा प्रफुल्ल शिलेदार यांनी ज्ञानेंद्रपती यांच्या हिंदीतून अनुवादीत केलेल्या 'संशयात्मा' काव्यसंग्रहास मिळाला आहे. अकादमीने २०१८ मधील अनुवादित साहित्यकृतींच्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी केली. यंदा २४ भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना पुरस्कार घोषित झाला आहे.
राजवाडे लेखसंग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधांच्या कोंकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीच्या निवड मंडळावर अनंत भावे, प्रभा गणोरकर व डॉ. विलास खोले होते. कोंकणी अनुवादीत पुस्तकाचे नाव 'राजवाडे लेखसंग्रह' असे आहे.
फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्रा'च्या आसामी अनुवादासाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार घोषित झाला. पन्नास हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुवादित पुस्तकांत मूळ हिंदी साहित्यकृती सर्वात जास्त आहेत. त्याखालोेखाल बंगाली साहित्याचा अनुवाद करणाºयांचा आहे.
अआपल्या कार्याची दखल घेतली गेली याचा आनंद झाला. गेली २५ वर्षे सातत्याने अनुवाद करीत आहे. विशिष्ट भूमिका घेऊन लिहितो, विशिष्ट भूमिका घेऊनच अनुवादही करतो. हाताला लागेल त्याचा अनुवाद करीत नाही. आपल्या विचारांशी जुळणाºया आणि साहित्य विश्वात मोलाची भर घालणाºया, मानवी मुल्यांची प्रस्थापना करणाºया साहित्याची मी अनुवादासाठी निवड करतो. भविष्यात जागतिक स्तरावरील निवडक साहित्याचा अनुवाद करण्याचा मानस आहे.
-प्रफुल्ल शिलेदार