प्रज्ञा पाटील यांचा योगासनांचा नवा विक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 01:38 AM2017-06-19T01:38:17+5:302017-06-19T01:38:17+5:30
नाशिकच्या योगप्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत ५७ तास योग करण्याचा नवा विक्र म रविवारी केला. सलग १०० तास योग करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी (जि. नाशिक) : नाशिकच्या योगप्रशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत ५७ तास योग करण्याचा नवा विक्र म रविवारी केला. सलग १०० तास योग करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
१६ जूनला पहाटे साडेचार वाजेपासून त्यांनी योगसाधनेला पिंप्री सदो गावाजवळ एका शांतस्थळी आरंभ केला. विविध आसने अखंडितपणे करीत केवळ द्रव पदार्थाचे सेवन करीत रविवारी दुपारी दीड वाजता त्यांनी तामिळनाडूच्या के. पी. रचना यांचा सलग ५७ तासांच्या सलग योगाचा विक्र म मोडीत काढला. डॉ. व्ही. गणेशकरण यांचा ६९ तासांचा विश्वविक्र म मोडीत काढण्याचा त्यांचा संकल्प आहे. संबंधित विक्र माची नोंद सोमवारी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्चे प्रतिनिधी घेणार असल्याची माहिती आयोजक रोहिणी नायडू यांनी दिली.