भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:25 PM2024-03-11T13:25:30+5:302024-03-11T13:26:51+5:30

आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल? या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

Prakash Ambedkar attacked the BJP over the statement made by BJP MP Anantakumar Hegde on the Constitution | भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

भाजपाला हुकूमशाही आणायचीय, 'त्या' वक्तव्याचं नवल नाही; प्रकाश आंबेडकरांचा टोला

मुंबई - Prakash Ambedkar on AnantKumar Hegade ( Marathi News ) कर्नाटकच्या भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्या वक्तव्याचे मला नवल वाटलं नाही. सार्वजनिकरित्या असं वक्तव्य करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. २०१७ मध्येही त्यांनी हेच म्हटल्याची आठवण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. तसेच १९५० मध्ये संविधान स्वीकारल्यानंतर आरएसएसने घेतलेली ही प्रतिज्ञा असल्याचा टोलाही प्रकाश आंबेडकरांनीभाजपाला लगावला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतीय संविधान हटवून त्याजागी मनुस्मृती आणण्याच्या आरएसएस आणि भाजपच्या दीर्घकालीन योजनेचा हा भाग आहे. त्यांना हुकूमशाही आणायची आहे आणि स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. तसेच आपल्या राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेची रचना बदलवायची आहे असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल? या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

काय म्हणाले होते अनंत कुमार हेगडे?

हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत. हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं. 

Web Title: Prakash Ambedkar attacked the BJP over the statement made by BJP MP Anantakumar Hegde on the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.