मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:50 PM2024-04-12T15:50:46+5:302024-04-12T15:52:32+5:30

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली असून, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंच्या पाठिशी किती मराठा समाज उभा आहे, याची आकडेवारी दिली.

prakash ambedkar claims on what percentage of the maratha community voters support manoj jarange patil | मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने एकामागून एक उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारांची पाचवी यादी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यातच मनोज जरांगे यांच्या पाठिशी किती टक्के मराठा समाजातील मतदार आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकेल, याबाबत भाष्य केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे बांधव एकत्र आले होते. मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. सुरुवातीला निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर माघार घेतली. दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली होती. मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना किती टक्के मराठा समाजातील मतदारांचा पाठिंबा आहे, याबाबतचा एक आकडा सांगितला.

मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज?

मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानत आहे. ३० टक्के मतदार हा मनोज जरांगे पाटील म्हणतील, तसे मतदान करणार आहे, असा थेट आकडा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने २०२९ च्या निवडणुकीची तयारी करावी. दुसऱ्या बाजूस सत्तेत नसणारी काँग्रेस देश फोडणार असाही प्रचार चालू आहे. नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे सरकार असे संबोधित नाहीत. कोणतीही योजना आली की, ती सरकारची आहे, असे न सांगता, नरेंद्र मोदींची आहे, अशी मांडली जाते. ज्यांनी काँग्रेस संपवायची गोष्ट केली, त्यांनी स्वतःहून भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग अवलंबला आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही. नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
 

Web Title: prakash ambedkar claims on what percentage of the maratha community voters support manoj jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.