...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:51 PM2020-07-27T14:51:14+5:302020-07-27T14:57:33+5:30

राजकीय टोलेबाजीवरून आंबेडकर यांचा विरोधी पक्षावर जोरदार निशाणा

prakash ambedkar hits out at bjp leader devendra fadnavis and chandrakant patil | ...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला

...तर इगतपुरीत जाऊन विपश्यना करा; आंबेडकरांचा फडणवीस, पाटलांना सल्ला

googlenewsNext

मुंबई: एकीकडे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकार पाडण्याची आव्हानं दिली जाता असताना विरोधकांकडून सरकारला तीन चाकी रिक्षाची उपमा दिली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या जुगलबंदीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विपश्यना करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्य कोरोना संकटातून जात असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यावरून वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. 'सत्तेसाठी कासावीस झालेल्या भाजपाच्या चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे विरोधीपक्ष म्हणून प्रतीक्षा करावी आणि ते शक्य नसल्यास इगतपुरीमध्ये जावून विपश्यना करावी,' असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांना दिला आहे.



प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे लॉकडाऊन न वाढवण्याची मागणी केलेली आहे. लॉकडाऊन न हटवल्यास माणसं उपासमारीनं मरतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 'उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. कोरोना विषाणूनं सगळ्यांना भीती घातली. मीसुद्धा त्यावेळी घाबरलो होतो. ४० टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं म्हटलं होतं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर भारतात कोरोना पसरु शकणार नाही, असं ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं. भारतीयांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असल्याचं तिथल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं,' असा संदर्भ आंबेडकरांनी दिला.

लॉकडाऊन न वाढवता अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मागे लागण्याचं आवाहन आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. 'बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपण अर्थव्यवस्था सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, अन्यथा उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवू नका,' असं आवाहन आंबेडकरांनी केलं आहे.

"महाविकास आघाडीच्या रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंकडे, पण कुठं जायचं हे ठरवतात मागे बसणारे"

आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

Web Title: prakash ambedkar hits out at bjp leader devendra fadnavis and chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.