भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:41 PM2024-04-29T15:41:29+5:302024-04-29T15:41:57+5:30

Prakash Ambedkar News: नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट ते जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

prakash ambedkar reaction after bjp declared ujjwal nikam as a candidate in north central mumbai for lok sabha election 2024 | भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”

भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”

Prakash Ambedkar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. यामुळे या जागेसाठी इच्छुक असणारे नसीम खान नाराज झाले आणि प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यातच भाजपाने याच उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उत्तर-मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही. लोकांना त्यांच्या माध्यमातून एक चॉईस आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजपाला एक लाख दीड लाख मतदान मिळाले होते. तसे यंदा आता दिसत नाही. नवीन तरुण भाजपकडे आहे असे दिसत नाही. मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. जे कमी झालेले मतदान हे भाजपाचे आहे. त्याचा परिणाम भाजपाला भोगावे लागणार आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही

पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात आम्हाला जास्त जागा मिळणार, असा दावा भाजपा करताना दिसत नाही. नरेंद्र मोदींच्या सभांचा काही फायदा होणार नाही. उलट मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा आम्हाला फायदा होणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच काही ठिकाणी काँग्रेस आणि काही भाजपा यांच्यात लढत होत आहे. जो कुणी जिंकेल तो २५ हजारांच्या फरकाने जिंकेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसला लोकांचा चांगला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे शिवसेना आता मुस्लिम मतांकडे वळली आहेत. आम्ही काँग्रेससोबत आहोत आम्हाला मतदान करा, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र तुम्ही विधानसभेला काँग्रेससोबत राहणार का? १२ मतदारसंघात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढत आहे. याचा फायदा आम्हाला होताना दिसत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आवाहन केल्यामुळे उमेदवार दिला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: prakash ambedkar reaction after bjp declared ujjwal nikam as a candidate in north central mumbai for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.