Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:17 PM2022-07-01T14:17:36+5:302022-07-01T14:19:08+5:30

Maharashtra Political Crisis: चंद्रकांत पाटील हे अमित शाहांच्या जवळचे आहेत. मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

prakash ambedkar reaction over eknath shinde as a chief minister and devendra fadnavis as deputy cm | Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

Next

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर गेल्या जवळपास १० दिवसांत राज्याच्या सत्ता संघर्षात अनेकविध घटना घडलेल्या पाहायला मिळाले. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजकीय वर्तुळाला पुन्हा अचंबित केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या या नव्या सरकारसंदर्भात प्रतिक्रिया आल्या आहेत. यातच आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. मी मंत्रिमंडळाचा भाग नसेन. पण एकनाथ शिंदे यांना सर्वतोपरी मदत करेन, असे म्हटले होते. मात्र, काहीच वेळात भाजपच्या दिल्लीतील पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षादेश काढला. यानंतर देवेंद्र फडणवीस काहीसे नाराज दिसले. मात्र, पक्षादेश मान्य करून ते शपथबद्ध झाले. हा राजकीय वर्तुळासाठी मोठा धक्का होता. यावरूनही अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा बळी का?

चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे. ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
 

Web Title: prakash ambedkar reaction over eknath shinde as a chief minister and devendra fadnavis as deputy cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.