Rajya Sabha Election 2022: “खरी लढत भाजपशी, गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 09:09 AM2022-06-04T09:09:54+5:302022-06-04T09:11:13+5:30

Rajya Sabha Election 2022: भाजपचा उमेदवार निवडून आल्यास राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते, असे भाकित एका बड्या नेत्याने केले आहे.

prakash ambedkar said ncp will have to elect shiv sena candidate to maintain its stronghold | Rajya Sabha Election 2022: “खरी लढत भाजपशी, गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल”

Rajya Sabha Election 2022: “खरी लढत भाजपशी, गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल”

googlenewsNext

मुंबई:राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून, याचा नेमक्या कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कुणाला धक्का बसतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच आता वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केले आहे. खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजप नसून, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी आहे. आपला गड राखण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे पाहते, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सहावा उमदेवार शिवसेनेचा पण आहे आणि भाजपचा देखील आहे. भाजपचे सहावे उमेदवार हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे  प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा अशी झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटले जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणे भाजपला सोपे जाईल, केंद्राच्या हातात इथेनॉलचे लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 
 

Web Title: prakash ambedkar said ncp will have to elect shiv sena candidate to maintain its stronghold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.