Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:01 PM2019-10-09T17:01:22+5:302019-10-09T17:15:23+5:30

Maharashtra Election 2019 : वंचित बहुजन आघाडीचा म्हणजेच प्रकाश आंबेडकरांचा अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होतो.

Prakash Ambedkar should come to BJP, appeal by ramdas athawale | Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

Next

रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनीप्रकाश आंबेडकरांनाभाजपात येण्याचं आवाहन केलंय. प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केल्यास, सर्वच दलित संघटनांची एकत्र मूठ बांधण्यासाठी आपण भाजपला सोडणार का? असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, आठवलेंनी स्वत:ची तयारी दर्शवली आहे. दलित चळवळीच्या ऐक्याची माझी भूमिका कायम आहे, असे आठवलेंनी म्हटले. मात्र, प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात आलं पाहिजे, असेही आठवले म्हणाले. 

वंचित बहुजन आघाडीचा म्हणजेच प्रकाश आंबेडकरांचा अप्रत्यक्षपणे भाजपाला फायदा होतो. माझा भाजपाला प्रत्यक्ष फायदा होतो. सध्या बहुजन समाजही हा भाजपासोबतच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भजापात यावे, असे आवाहनच आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे. तसेच, वंचित भाजपाची बी टीम असेल, तर मी भाजपाची ए टीम आहे, असेही ते आपल्या विनोदी शैलीत म्हणाले. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून बहुजन समाज भाजपासोबत आलाय. आता, भाजापानेही आपली भूमिका बदलली असून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करता येणार नाही, हेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित झालंय. त्यामुळेच, बाबासाहेबांचा संविधान नसतं, तर मी कधीच पंतप्रधान झालो नसतो, असे मोदी सांगतात. भाजपा पक्षच पूर्वीसारखा राहिला नसून बदलला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भाजपात यावे, असे आठवलेंनी म्हटले. एका खासगी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीवेळी आठवलेंनी भाजपा-सेना, युतीतील जागावाटप, कॅबिनेट मंत्रीपद आणि आंबेडकर चळवळीबाबत चर्चा केली. 

Web Title: Prakash Ambedkar should come to BJP, appeal by ramdas athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.