"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:03 AM2022-06-23T11:03:37+5:302022-06-23T11:04:24+5:30

Prakash Ambedkar : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

prakash ambedkar tweet on eknath shinde revolt | "शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. पण, एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम आहे. यातच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह देत म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?",  असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीपासूनच आपण शिवसैनिकच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. पण, ते वेगळा गट करूनच भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होतील, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेत सर्वात मोठे बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचे एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर काय बोलतात, याचा भाजपशी काही संबंध नाही- अतुल भातखळकर 
भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेले सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे, असेही अतुल भातखळकर म्हणाले. 
 

Web Title: prakash ambedkar tweet on eknath shinde revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.