'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:44 PM2024-03-09T13:44:46+5:302024-03-09T13:45:47+5:30

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही.

'Prakash Ambedkar will not form alliance with Mahavikas Aghadi'; Claim by Sanjay Shirsat | '...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

'...म्हणून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही'; संजय शिरसाट यांचा दावा

भाजपा जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचे धोरण बदलणार असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय समझौता करायला तयार आहोत, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवी गुगली टाकली. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. 

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढवणार, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना दिला. याचदरम्यान प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे कधी जमलेले नाही. त्यामुळे त्यांची युती होणार नाही, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात १५ जागांवर अजूनही तिढा आहे. तो सुटलेला नाही. आघाडी होणार की नाही याविषयी शंका आहे. जागेचे हे भिजत घोंगडे मिटल्याशिवाय वंचितला किती जागा मिळणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जागा सोडो अथवा न सोडो ४८ जागा लढविण्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. २७ जागांची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला मी उद्या जाणार आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर आम्ही आमचा निर्णय घोषित करू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

तिन्ही पक्ष मागे लागलेत-प्रकाश आंबेडकर

राज्यातील तिन्ही प्रमुख पक्ष आम्हाला विचारत नव्हते. हे आम्हाला आघाडीमध्ये पहिल्यांदा घेत नव्हते. मात्र, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 'वंचित'ची सव्वादोन लाख मते आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष आम्हाला आघाडीत सामावून घेण्यासाठी आमच्या मागे लागल्याचे ॲड आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: 'Prakash Ambedkar will not form alliance with Mahavikas Aghadi'; Claim by Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.