प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी. लिट
By admin | Published: November 8, 2016 04:49 AM2016-11-08T04:49:57+5:302016-11-08T04:49:57+5:30
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठातर्फे डॉक्टर आॅफ लिटरेचर (डी.लिट) या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला आहे.
नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठातर्फे डॉक्टर आॅफ लिटरेचर (डी.लिट) या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या मुख्यालयात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत आमटे यांना डी.लिट पदवी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. डॉ. आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचाही सन्मान केला जाणार आहे.
प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविल्यानुसार आमटे यांचा यशोचित सन्मान करण्याचा प्रस्ताव कुलपती व व्यवस्थापन परिषदेने समंत केला होता.
विद्यापीठातर्फे डॉ. एल. एच. हिरानंदानी, डॉ. अनिल कोहली, डॉ. सायरस पुनावाला यांना याआधी डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)