Maharashtra Politics: १२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 10:55 PM2022-09-17T22:55:48+5:302022-09-17T22:56:58+5:30

Maharashtra News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर लगेचच काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

prakash patil and waman mhatre left the shiv sena and join eknath shinde group after uddhav thackeray dismiss | Maharashtra Politics: १२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट

Maharashtra Politics: १२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंनी केली हकालपट्टी! शिंदे गटात एन्ट्री, लगेच उपनेतेपदाचे गिफ्ट

googlenewsNext

Maharashtra Politics: कनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही तीव्र होताना पाहायला मिळत आहे.यातच उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या एका जिल्हाप्रमुखाने शिंदे गटात प्रवेश केला असून, एकनाथ शिंदे यांनी त्यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. 

ठाणे जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्याची घोषणा केली. मध्यरात्री ३ वाजता हा प्रवेश पार पडल्याचे सांगितले जात आहे. 

१२ वर्ष शिवसेनेसाठी काम, ठाकरेंकडून हकालपट्टी

गेली १२ वर्ष प्रकाश पाटील शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत होते. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या संघटन कौश्यल्याचा नक्कीच पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची बदलापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बदलापूर परिसरात शिंदे गटाला अधिक बळ मिळेल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी घोषणा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर वामन म्हात्रे यांनी बदलापूरमधील सर्वच्या सर्व नगरसेवकांना घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.

 

Web Title: prakash patil and waman mhatre left the shiv sena and join eknath shinde group after uddhav thackeray dismiss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.