प्रणवला ‘दहाहजारी’ शिष्यवृत्ती

By admin | Published: January 7, 2016 02:46 AM2016-01-07T02:46:25+5:302016-01-07T02:46:25+5:30

शालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांची विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या प्रणव धनावडे याची जबाबदारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) घेतली आहे.

Pranavah 'ten thousand' scholarship | प्रणवला ‘दहाहजारी’ शिष्यवृत्ती

प्रणवला ‘दहाहजारी’ शिष्यवृत्ती

Next

मुंबई : शालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांची विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या प्रणव धनावडे याची जबाबदारी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) घेतली आहे. पुढील पाच वर्षे त्याला दरमहा दहा हजार रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती देण्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
प्रणवला ही शिष्यवृत्ती २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी दिली जाणार आहे. संघटना या कालावधीत त्याच्या क्रिकेट व शिक्षणाच्या प्रगतीवरही लक्ष ठेवणार आहे. कल्याणच्या के. सी. गांधी उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या प्रणवने आर्या गुरुकुल संघाविरुद्धच्या सामन्यात केवळ ३२३ चेंडूंत नाबाद १००९ धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित
केला आहे.

Web Title: Pranavah 'ten thousand' scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.