प्रणिती शिंदेंनी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा ठोकणार - ओवैसी
By admin | Published: November 6, 2014 03:26 PM2014-11-06T15:26:52+5:302014-11-06T15:41:29+5:30
एमआयएमसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रणिती शिंदेंनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू असा इशारा ओवैसींनी दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ६ - एमआयएमबद्दल केलेले वक्तव्य सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदेना महागात पडण्याचे चिन्हं दिसत आहे. शिंदे यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी अशी मागमी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसे न केल्यास शिंदेंवर मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
एमआयएमचे नेते कोणत्याही समाजाच्या बाजूने बोलत नसून ते देशाच्या विरोधात बोलतात असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. देशद्रोही एमआयएम पक्षातील नेत्यांच्या भाषमांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना ओवैसी यांनी प्रणिती शिंदे यांचे हे वक्तव्य उन्मत्तपणाचे असून केवळ नैराश्यातून त्यांनी असे वक्तव्य केल्याचा आरोप केला. २००४ ते २०१२ या काळात आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला, तेव्हा शिंदेनी आमच्याबाबत आक्षेप घेऊन विरोध का केला नाही. आमची भाषण जर आक्षेपार्ह वाटत असतील तर याप्रकरणी पोलिसांत तक्रार का केली नाही असे सवाल केले. सोलापूर हा भारत देशाचा एक भाग असून तो कोणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमच्या पक्षासंदर्भात केलेल्या वक्तव्याबददल शिंदे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू असे त्यांनी सांगितले.