प्रणितीने कोणाशीही लग्न करावे, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2016 02:09 AM2016-08-28T02:09:31+5:302016-08-28T02:09:31+5:30

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचे पडसाद समाजावर पडत असतात. त्यात तरुण आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत

Praniti should marry anyone, but ... | प्रणितीने कोणाशीही लग्न करावे, पण...

प्रणितीने कोणाशीही लग्न करावे, पण...

Next

- राजा माने, सोलापूर

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचे पडसाद समाजावर पडत असतात. त्यात तरुण आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत तर तरुणाई जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. तशाच वलयाच्या धनी असलेल्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे! प्रणिती लग्न कधी करणार? त्यांचा जीवनसाथी कोण असेल? असे अनेक सवाल सोलापूरकर आणि राज्यातील त्यांना ओळखणाऱ्या तरुणाईमध्ये नेहमीच चर्चिले जातात. याच चर्चेला नव्याने वाट करून देण्याचे काम खुद्द प्रणितीच्या वडिलांनीच शनिवारी केले.
असं म्हणतात की, कन्येचा विवाह हा प्रत्येक पित्याच्या जीवनातील कर्तव्यपूर्तीचा एक क्षण असतो. अशा कर्तव्याचे भान राखण्याला सुशीलकुमार शिंदेंसारखे नेते तरी कसे अपवाद ठरतील? ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी आज ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात सुशीलकुमारांशी संवाद साधताना सुशीलकुमारांवर प्रणितीच्या लग्नाचा अनाहूत बाऊन्सर टाकला! ‘सलमान खान कधी लग्न करणार? हा प्रश्न जसा नेहमीच चर्चेत असतो, तसाच प्रणिती शिंदे लग्न कधी करणार...’ असा सवाल खांडेकरांनी केला आणि पिता सुशीलकुमार बोलते झाले... ‘प्रणितीने कुणाशीही लग्न करावे, पण तो कमावता असावा, त्याने तिला सांभाळले पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे. मी प्रणितीला सांगितले आहे की, जात-पात या गोष्टी मी मानत नाही. तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. मी देखील प्रेमविवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे.’ मवाळ राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशीलकुमारांंनी आपली कन्या प्रणिती मात्र आक्रमक असल्याचे आवर्जून सांगितले.

Web Title: Praniti should marry anyone, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.