प्रशांत कोरटकरच्या दोन कार नागपुरातून जप्त; कृत्याचा पश्चात्ताप; पण न्यायालयात मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:49 IST2025-03-30T08:45:39+5:302025-03-30T08:49:03+5:30

Prashant Koratkar News: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या चौकशीत वारंवार पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. अनावधानाने चूक झाल्याचे सांगत असला, तरी न्यायालयात मात्र याबद्दल मौन बाळगत आहे.

Prashant Koratkar's two cars seized from Nagpur; Regret for the act; But silence in court | प्रशांत कोरटकरच्या दोन कार नागपुरातून जप्त; कृत्याचा पश्चात्ताप; पण न्यायालयात मौन

प्रशांत कोरटकरच्या दोन कार नागपुरातून जप्त; कृत्याचा पश्चात्ताप; पण न्यायालयात मौन

कोल्हापूर  - इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या चौकशीत वारंवार पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. अनावधानाने चूक झाल्याचे सांगत असला, तरी न्यायालयात मात्र याबद्दल मौन बाळगत आहे. पसार काळात त्याने वापरलेल्या कार पोलिसांनी नागपुरातून जप्त केल्या, तसेच १७ ते २४ मार्चच्या दरम्यान त्याला खर्चासाठी दीड लाखाची रोकड कोणी दिली, याचीही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

कोरटकर याने पसार काळात नागपूर, चंद्रपूर, बैतूल, हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर आणि करीमनगर (तेलंगणा) येथे वास्तव्य केले. यासह तो वावरलेल्या एकूण १८ ठिकाणांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. नागपुरात गेलेल्या पथकाने कोरटकर याची एक आलिशान कार जप्त केली, तसेच त्याचा मित्र मटका बुकी धीरज चौधरी याचीही कार जप्त केली.

Web Title: Prashant Koratkar's two cars seized from Nagpur; Regret for the act; But silence in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.