मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार संवेदनाहीन : दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 16:17 IST2020-02-20T16:08:36+5:302020-02-20T16:17:46+5:30
राज्यात कुठेही आंदोलन,उपोषण झाल्यास दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी स्वता: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलवत होते.

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार संवेदनाहीन : दरेकर
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार संवदनाहीन आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात 24 दिवसांपासून आंदोलक आंदोलन करत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. तर भाजपची सत्ता असताना राज्यात कुठेही आंदोलन झाल्यास त्याची दखल घेऊन मार्ग काढला जात होता, मात्र हे दुर्लक्ष करत असल्याचे सुद्धा ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागात नोकरभरती झाली. नोकरभरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या. मात्र नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण गेल्या 24 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. आंदोलनकर्त्यांची प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
दरेकर म्हणाले की, गेल्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना, राज्यात कुठेही आंदोलन,उपोषण झाल्यास दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी स्वता: तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बोलवत होते. आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढत होते. तसेच कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळवून देण्याच काम ही त्यांनी केलं. मात्र हे सरकार आल्यापासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते पूर्णपणे संवदनाहीन असल्याची टीका दरेकर यांनी केली.