बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 08:07 PM2021-04-16T20:07:28+5:302021-04-16T20:09:26+5:30

palghar mob lynching case: पालघर साधू हत्याकांड प्रकणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case | बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

Next
ठळक मुद्देपालघर साधू हत्याकांडावरून शिवसेनेवर निशाणाप्रवीण दरेकर यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकाया प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही - दरेकर

मुंबई: राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती, कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, १५ दिवसांसाठी लावण्यात आलेले निर्बंध यावरून विरोधक ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता पालघर साधू हत्याकांड प्रकणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडल्यामुळे केवळ सत्तेसाठी या प्रकरणांकडे सरकार दुर्लक्ष करीत असून,  सत्तेसाठी शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असावी, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case) 

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गडचिंचले गावातील जमावाने दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची निघृण हत्या केली होती. या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणात अद्याप दोषींना शिक्षा झाली नसल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रवीण दरेकर आणि आचार्य तुषार भोसले यांनी मंत्रालयाजवळ लाक्षणिक उपोषण केले. यावेळी ते बोलत होते. 

या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही

पालघर साधू हत्याकांड प्रकरणात तपास पूर्ण करून दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबाबत आवश्यक ती पावले महाविकास आघाडी सरकारने उचलली नाहीत. एक वर्ष पूर्ण झाले तरी या प्रकरणात न्याय मिळू शकलेला नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाची चौकशी त्रयस्त एजन्सीमार्फत करण्याची मागणी केली आहे. तसेच दुर्घटनास्थळी जाऊन हत्या झालेल्या साधु-महंतांना श्रद्धांजली देणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

“खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”: जितेंद्र आव्हाड

शिवसेनेवर बोचरी टीका

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. त्यांनी हिंदुत्वासाठी ‘मशाल’ पेटवली होती. आता सत्तेवर त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी असताना ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हत्याकांडावरील आपले मौन सोडावे आणि सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
 

Web Title: pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.