Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:30 PM2021-12-03T18:30:13+5:302021-12-03T18:31:42+5:30

Pravin Darekar : प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे.

Pravin Darekar: Transport Minister should pave way in coordination, mesma is not the last resort - Pravin Darekar | Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर

Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर

Next

मुंबई : सरकार हिटलरशाही पद्धतीने काम करत आहे. सर्व एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. परिवहन मंत्र्यानी यातून समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.

प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे. मी स्वतः राज्यभर फिरतोय. सर्व डेपो कडेकोट बंद आहेत. विलीनीकरण मागणीसाठी जीवाची परवा करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. अशा वेळेला समन्वयातून मार्ग काढून विषय सोडवणे महत्त्वाचे आहे तर याउलट सरकार कारवाई करत आहे. 

निलंबन करत आहे. सेवा समाप्ती करत आहे आणि आता तर मेस्मासारखी कारवाई सरकार करण्याच्या विचारात आहे. सरकारला अशा पद्धतीने आंदोलन चिरडता येणार नाही. जे आंदोलक कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढा. अशा प्रकारची जोरजबरदस्ती आणि सरकारी कायद्याचा इंगा दाखवून मेस्मा अंतर्गत कारवाई करू नये, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

याचबरोबर, ते पुढे म्हणाले की,  कर्मचाऱ्यांनाही माझे आवाहन आहे की आत्महत्या करू नका, टेन्शन घेऊ नका. जिवापेक्षा मोठे काही नाही. आंदोलकांनी सरकारबरोबर चर्चेची भूमिका घ्यावी आणि मार्ग काढावा तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये अशीही आमची भूमिका आहे. म्हणून कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत परिवहन मंत्र्यानी यातून मार्ग काढायला हवा. मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे.

Web Title: Pravin Darekar: Transport Minister should pave way in coordination, mesma is not the last resort - Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.