निवडणुकीसाठी प्रवीण दवणेंच्या नागपुरात साहित्यिकांशी भेटीगाठी
By Admin | Published: October 14, 2016 02:16 AM2016-10-14T02:16:23+5:302016-10-14T02:16:23+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे हे नागपुरात डेरेदाखल
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे हे नागपुरात डेरेदाखल झाले असून, आपल्या तीन दिवसांच्या मुक्कामात ते साहित्यिकांशी भेटीघाटी घेत आहेत.
नागपुरात बुधवारी पोहोचल्यानंतर दवणे यांनी महामंडळाकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत, त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. हा माझा प्रचारदौरा नाही, पण नागपुरात आलोच आहे, तर भेटीगाठी या होणारच आणि भेट झाली, तर निवडणुकीच्या चर्चेशिवाय ती कशी पूर्ण होईल, असा प्रतिप्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित करून त्यांनी नागपूर भेटीचे ‘प्रयोजन’ सांगितले.
निवडणूक, राजकारण हा माझा पिंड नाही. साहित्य क्षेत्रातील माझ्या थोड्या-अधिक योगदानाच्या बळावर मी मराठी साहित्य संमेलनाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात यश मिळते की अपयश, याची मला पर्वा नाही. हा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न आहे. यश नाहीच मिळाले, तर पुन्हालिखाणाच्या कामात स्वत:ला गुंंतवून घेईल. तिकडेही खूप काम
करायचे अजून बाकी आहे, असे दवणे म्हणाले. (प्रतिनिधी)