पूर्वमोसमी पावसात ५ टक्के घट

By admin | Published: May 22, 2017 03:22 AM2017-05-22T03:22:02+5:302017-05-22T03:22:02+5:30

पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे पावसासाठी आवश्यक ढगनिर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी पावसात देशभरात ५ टक्के घट झाली आहे़

Pre-monsoon rainfall decreases by 5 percent | पूर्वमोसमी पावसात ५ टक्के घट

पूर्वमोसमी पावसात ५ टक्के घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे पावसासाठी आवश्यक ढगनिर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी पावसात देशभरात ५ टक्के घट झाली आहे़ १ मार्च ते १८ मे २०१७ दरम्यान देशभरात ९७़८ मिमी पावसाची नोंद झाली़ देशाच्या १०२़७ मिमी या सरासरीपेक्षा ती कमी आहे़ गेल्या दोन-तीन दिवसांत कोकण वगळता राज्यात अन्यत्र पूर्वमोसमी पाऊस झालेला नाही़
देशभरातील ३६ हवामान विभागांपैकी केवळ कोकण आणि बिहार या २ विभागांत सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असून ३ विभागांत जादा पाऊस झाला आहे़ ११ विभागांत सरासरीएवढा पाऊस झाला. १३ विभागांत ५९ टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला असून ७ विभागांत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़
मार्च आणि एप्रिल महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयारच झाले नाही़ राजस्थान, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आल्याने तेथून येणारे वारे उष्ण व कोरडे होते़ त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती़ तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामध्येही बाष्प नसल्याने पूर्वमोसमी पाऊस कमी झाला़

Web Title: Pre-monsoon rainfall decreases by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.