मान्सून उंबरठ्यावर, कोकणासह राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 06:03 AM2018-06-04T06:03:11+5:302018-06-04T06:03:11+5:30

नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटकात स्थिरावला असून रविवारी कोकणात सिंधुदुर्गसह राज्यातील काही भागांत वादळ-वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. राज्यात पावसाच्या आगमनास अनुकूल स्थिती असून शनिवारपासून सुरू असलेल्या ठिकठिकाणच्या पावसाने मान्सूनची वर्दी दिली आहे.

Pre-monsoon rainfall in most parts of the state, including Konkan on the monsoon terrace | मान्सून उंबरठ्यावर, कोकणासह राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस

मान्सून उंबरठ्यावर, कोकणासह राज्यातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस

googlenewsNext

मुंबई : नैऋत्य मोसमी पाऊस कर्नाटकात स्थिरावला असून रविवारी कोकणात सिंधुदुर्गसह राज्यातील काही भागांत वादळ-वाऱ्यांसह पूर्वमोसमी पाऊस झाला. राज्यात पावसाच्या आगमनास अनुकूल स्थिती असून शनिवारपासून सुरू असलेल्या ठिकठिकाणच्या पावसाने मान्सूनची वर्दी दिली आहे. कोकणात ६ ते ८ जूनपर्यंत मान्सून धडकणार असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले आहे.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर १० जूनपर्यंत तो अर्धा महाराष्ट्र व्यापेल. १३ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ६ व ७ जूनला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे़ रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जालना, सोलापूर, जळगाव जिल्ह्यातही पाऊस झाला.
४ जूनला कोकण,गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ५ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पावसाचे पाच बळी
धुळे जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वाºयांसह जोरदार पाऊस झाला. वरखेडी गावाजवळ शेतातील एका घरावर रात्री झाड पडून अनिता दादूराम पावरा (३२) यांच्यासह वशिला (३), पिंकी (२) व रोशनी (१) या त्यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या. दुर्घटनेत दादूराम पावरा बचावले. नाशिकला इगतपुरी तालुक्यात वीज पडून दशरथ धोंडू ढवळे (२७) याचा मृत्यू झाला. सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली.

मान्सूनची वेगाने वाटचाल सुरू आहे. १५ जूननंतर राज्यातील सर्व भागात जोराचा पाऊस सुरू होईल. १५ ते २० जून दक्षिण महाराष्ट्रात पाऊस उघडीप देईल. जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर शेतकºयांनी पेरणी करावी.
- डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामान तज्ज्ञ

Web Title: Pre-monsoon rainfall in most parts of the state, including Konkan on the monsoon terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस