महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती’

By Admin | Published: March 26, 2017 03:33 AM2017-03-26T03:33:49+5:302017-03-26T03:33:49+5:30

महावितरणच्या वर्ग ३ आणि वर्ग ४च्या लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ या पदांना

'Preemptive retirement' for Mahavitaran employees | महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती’

महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती’

googlenewsNext

मुंबई : महावितरणच्या वर्ग ३ आणि वर्ग ४च्या लाइन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ या पदांना १ एप्रिलपासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात येणार असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची ४५ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. जे तारमार्ग कर्मचारी दैनंदिन कर्तव्य आजारपण, अपघात इत्यादी कारणांमुळे पार पाडू शकत नाहीत, अशा वर्ग ३ आणि वर्ग ४च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. योजनेत पात्र होण्यासाठी ‘दैनंदिन कामे सुरळीत
पार पाडू शकत नाही’ अशा
आशयाचे सिव्हिल सर्जनचे
प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी ‘विद्युत सहायक’ पदावरील नोकरी हा विकल्प शाबूत ठेवून आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण असणे  अथवा दहावी, बारावीनंतर इलेक्ट्रिकल/वायरमनचा आयटीआय हा कोर्स महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे कर्मचारी आपल्या पाल्यांसाठी नोकरीचा विकल्प न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी किमान ३५ दिवसांचा पगार आणि विहित सेवानिवृत्ती पूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार अशा सूत्रानुसार लाभ मिळणार आहे. हा लाभ जास्तीत जास्त एकूण १५ लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे. (प्रातिनिधी)

पाल्यांसाठी नोकरीचा विकल्प
कर्मचारी वर्गाने पाल्यांसाठी ‘विद्युत सहायक’ पदावरील नोकरीचा विकल्प शाबूत ठेवून, या योजनेचा लाभ घेतल्यास; ज्यांचे पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना तीन वर्षांत इलेक्ट्रिकल/ वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता धारण करावयाची आहे. या कालावधीत त्यांनी कंपनीचे काम करायचे नसून, त्यांनी त्यांची कार्यालयीन कामकाजाच्या दिवसाची हजेरी संबंधित विभाग/उपविभागीय कार्यालयात द्यायची आहे.

Web Title: 'Preemptive retirement' for Mahavitaran employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.