गर्भवतीस चुकून गर्भपाताच्या गोळ्या
By admin | Published: June 23, 2017 01:22 AM2017-06-23T01:22:15+5:302017-06-23T01:22:15+5:30
गर्भपातासाठी आलेल्या रुग्णाचे औषध परिचारिकेने गर्भवतीस दिल्याने त्या महिलेची मूदतीपूर्व प्रसूती झाली. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे महिलेला झालेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गर्भपातासाठी आलेल्या रुग्णाचे औषध परिचारिकेने गर्भवतीस दिल्याने त्या महिलेची मूदतीपूर्व प्रसूती झाली. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे महिलेला झालेल्या जुळ््या मुलींपैकी एका मुलीचा मृत्यू ओढावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जसलोक रुग्णालयात विरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुर्ला येथील डॉ. तरन्नुम वसिफ खान २५ आठवड्यांची गर्भवती होती. जसलोक रुग्णालयात दाखल असताना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गर्भपातासाठी देण्यात येणारी औषधे देण्यात आली. यामुळे त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास प्रसूतीकळा जाणवू लागल्या. त्यावेळेस, शस्त्रक्रियेद्वारे दोन जुळ््या मुलींचा जन्म झाला. परंतु, त्यातील एका मुलीला १९ फेब्रुवारी रोजी अचानक श्वसनास त्रास होऊ लागला आणि त्याच तिचा मृत्यू ओढावला. तर दुसरी मुलगी तीन महिने रुग्णालयात दाखल होती. बाळ आणि बाळंतीणीला एप्रिल महिन्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व घडलेल्या घटनेविरोधात डॉ.खान यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी रुग्णालय प्रशासनाकडे याविषयी डॉ. खान यांनी दाद मागितली होती. परंत, योग्य प्रतिसाद न मिळाल्याने पोलीसात तक्रार करण्यात आली. याविषयी रुग्णालयाच्या डॉ.पूर्णिमा सातोसकर यांनी सांगितले की, रुग्णास कोणत्याही प्रकारचे चुकीचे औषध दिले नाही. तपासणीत बाळ आणि मातेची प्रकृती बरी आहे. याप्रकरणी, अंतर्गत चौकशीत कोणीही दोषी आढळले नाही.