पालखी सोहळ्याची तयारी वेगात

By admin | Published: June 22, 2016 12:39 AM2016-06-22T00:39:11+5:302016-06-22T00:39:11+5:30

श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नियोजन आणि तयारीची माहिती घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय

Preparations for Palkhi Festival | पालखी सोहळ्याची तयारी वेगात

पालखी सोहळ्याची तयारी वेगात

Next

देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नियोजन आणि तयारीची माहिती घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय प्रतिनिधींची आढावा बैठक झाली. सोहळ्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालखी सोहळा प्रस्थान सोमवारी (ता. २७) ठेवणार आहे. वारीतील भाविकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विविध कामांसाठी विविध खात्यांचे शासकीय अधिकाऱ्यांचे नियोजन आढावा बैठकीत घेण्यात आले. अप्पर तहसीलदार किरण कुमार काकडे , सरपंच हेमा मोरे, उपसरपंच सचिन कुंभार, संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख सुनीलमहाराज मोरे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, गटविकास अधिकारी संदीप कोहीनकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी मिलिंद मनवर, सचिन मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बिऱ्हाडे, महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश गुजर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धंनजय जगधने, विविध खात्याचे शासकीय अधिकारी,ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
संत तुकाराम संस्थानच्या वतीने मंदिरात २८ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले आहेत. जन्मस्थान मंदिराच्या बाजूने दिंड्यांना रांगा लावण्यात येऊन महाद्वारातून प्रवेश करून मंदिरातील प्रदक्षिणानंतर नारायणमहाराज दरवाजातून दिंड्या बाहेर निघण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पालखी सोहळाप्रमुख सुनीलमहाराज मोरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गुडसूरकर यांनी माहिती दिली. फिरते शौचालयांची वेगवेगळ्या दहा ठिकाणी जागा नियोजित करण्यात आले असून , अग्निशामक वाहन, औषध फवारणीसाठी फॉगिंग मशिन, पिण्याच्या पाण्याचे टँकर , पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरचा साठा, स्वच्छता, सफाई, पथदिवे दुरुस्ती करण्यात आले आहे. तसेच यात्रेच्या अनुषंगाने येणारी सर्व कामे पूर्ण केली जातील.
विद्युत विभागाच्या वतीने माहिती देताना अभियंता गुजर यांनी यात्रा काळात वीज खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घेत तळवडे देवी इंद्रायणी येथील स्वीचिंग केंद्र तात्पुरते सुरू करणार आहे. चोवीस तास विद्युत कर्मचारी उपलब्ध राहतील.
अभियंता गुजर यांनी यात्राकाळात वीज खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घेत तळवडे देवी इंद्रायणी येथील स्वीचिंग केंद्र तात्पुरते सुरू करणार आहे. चोवीस तास विद्युत कर्मचारी उपलब्ध राहतील. मुख्य मंदिर, जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर, गाथा मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात बाह्यरुग्ण विभाग सुरू केले असून, सोहळ्याबरोबर डॉक्टरांचे पथक राहणार असून, रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्याची माहिती डॉ. बिऱ्हाडे यांनी दिली. (वार्ताहर)
पालखी सोहळ्यात प्रथमच मोठा बंदोबस्त तैनात होणार आहे. एक उपअधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक, २५० पोलीस कर्मचारी, ६० वाहतूक पोलीस, ३०० गृहरक्षक दलाचे जवान, १०० महिला कर्मचारी यांसह साध्या गणवेशातील गोपनीय, गुन्हे शोधक पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतविरोधी पथक, फिरते कॅमेरे असणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी देहूत येणारे मार्गावरील वाहनांना प्रवेश बंदी करणार, पालखी बरोबरची वाहने तळवडेमार्गे निगडीकडे वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

Web Title: Preparations for Palkhi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.