श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 09:10 PM2017-09-19T21:10:13+5:302017-09-19T21:10:29+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.

Prepare the administration for the Navratri festival of Shrikhetra Mahuragad | श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

Next

श्रीक्षेत्र माहूर (जि. नांदेड) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने गडावर येणाºया भाविकांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर रोजी येथे नवरात्र महोत्सव नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

माहूरगडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या काळात राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक आई रेणुकेच्या दर्शनासाठी येतात. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, भाविकांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना व यात्रेचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व रेणुकादेवी संस्थानच्या शासकीय व अशासकीय विश्वस्तांची जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नियोजन आढावा बैठक बोलावली होती.

यावेळी आरोग्य विभागाकडून रेणुकादेवी मंदिर, दत्तशिखर, अनुसयामाता मंदिर, बसस्थानक, टी पॉर्इंट अशा ५ ठिकाणी आरोग्यपथक राहणार असून ३ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहेत. नगरपंचायत कार्यालयाकडून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून भाविकांना गडावर जाण्यासाठी सुसज्ज ८० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, डॉ.व्ही. एन. भोसले, अभियंता रवींद्र उमाळे, सचिन पांचाळ व सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्र यात्राकाळात कुठल्याही कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर करु नये, काही समस्या उद्भवल्यास थेट मला संपर्क करा. कर्मचारी हयगय केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला. मातृतीर्थ तलाव, सर्वतीर्थ व अन्य तलाव अथवा धबधब्याच्या ठिकाणी जीवरक्षक दलाची नेमणूक करुन ‘नो सेल्फी’ असे फलक लावावे, रेणुकादेवी ते दतशिखर मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यात काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्याने अशा धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे, मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळा किती भाविक दर्शन घेऊ शकतात याची माहिती सा. बां. विभागाने पोलीस प्रशासनाला द्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी केली.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून यात्राकाळात नऊ दिवस अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश ठेवला जाणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Prepare the administration for the Navratri festival of Shrikhetra Mahuragad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.