पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार

By admin | Published: December 2, 2015 03:04 AM2015-12-02T03:04:27+5:302015-12-02T03:04:27+5:30

‘पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला असून तो मतैक्यासाठी पत्रकार संघटनांना पाठवणार आहे. त्यामुळे लवकरच पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्त्वात येईल’,

Prepare the final draft of the press protection law | पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार

पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार

Next

मुंबई : ‘पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला असून तो मतैक्यासाठी पत्रकार संघटनांना पाठवणार आहे. त्यामुळे लवकरच पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्त्वात येईल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बुधवारी सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - २०१४ या सोहळ््यात मुख्यमंत्री बोलत होते.
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ अस्तित्त्वात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पत्रकारांच्या पेन्शनचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. त्यावर वित्त विभागासोबत सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच निर्णय व्हावा म्हणून कार्यवाही केली जाईल. सोबतच पत्रकारांच्या मेडीक्लेम संदर्भातही नवी योजना राबवण्याचा विचार सुरू असून त्यासाठी नवा करार करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्भीड पत्रकारितेसाठी पत्रकारांना सामाजिक सुरक्षा देण्यास राज्य सुरक्षा कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार सोहळ््यात ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टीळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले.

पुरस्कार वेळेत द्या!
राज्य शासनातर्फे २०११ ते १३ सालचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आघाडी सरकारने दिरंगाई केली होती. मात्र युती सरकारने फेब्रुवारी २०१५ महिन्यात या तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्रित बहाल केले. त्यानंतर २०१४ सालचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा आज पार पडला. मात्र २०१५ सालचा उत्कृष्ट पत्रकारिता सोहळा १ मे २०१६ पूर्वी पार पडेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय दरवर्षी नियमितपणे पुरस्कार सोहळा पार पडेल याची काळजी घ्यावी, असे आदेशही त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाला दिले.

‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानासाठी विशेष पुरस्कार
राज्याच्या जलशिवार योजनेला प्रसिद्धीतून यशस्वी करणाऱ्या पत्रकारांनी स्वच्छ
महाराष्ट्र अभियानाबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या अभियानाच्या जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुढील वर्षापासून विशेष पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुझफ्फर हुसेन यांना जीवनगौरव पुरस्कार
पुरस्कार सोहळ््यात ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.एक लाख रुपये आणि सन्माचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘लौटाना, लौट जाना ये हमारा धर्म और कर्म नही’, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांनी आपल्या शैलीत पुरस्कार वापसीवर भाष्य केले.

‘लोकमत’चा गौरव... राज्य शासनाच्या या पुरस्कार सोहळ्यातील एकूण १७ पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार ‘लोकमत’ने पटकावले. अमरावती विभागातून ‘लोकमत’चे हर्षनंदन सुरेश वाघ यांना ‘लोकनायक बापूजी अणे’, कोल्हापूरमधून ‘लोकमत’च्या इंदूमती गणेश (सूर्यवंशी) यांना ‘ग.गो. जाधव’ पुरस्कार आणि गोंदियातील ‘लोकमत समाचार’चे मुकेश शर्मा यांना ‘बाबूराव विष्णू पराडकर’ पुरस्कार, देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Prepare the final draft of the press protection law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.