मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 07:56 AM2024-03-16T07:56:16+5:302024-03-16T07:56:42+5:30

Ambadas Danve Latest News: दानवे एक-दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता, विमानतळावरून माघारी फिरले...

Preparing for a big earthquake! Ambadas Danve angry with Chandrakant Khaire Candidacy; On the way to the Shinde group? efforts on Matoshree | मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

मोठ्या भूकंपाच्या तयारीत! अंबादास दानवे नाराज; शिंदे गटाच्या वाटेवर? मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क 
छत्रपती संभाजीनगर : आमच्याद वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार करू असे सांगणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीतून दानवे एक-दोन दिवसांत शिंदे गटात जाण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे दानवे नाराज झाले आहेत. दानवेंनाही लोकसभा लढवायची होती. गेल्या काही महिन्यांपासून दानवे तशी वक्तव्येही करत होते. 

जिल्ह्यात खैरे-दानवे यांचे सख्य सर्वांना ठाऊक आहे. पक्ष फुटीनंतर दोघेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असले तरी उभयतांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभेसाठी खैरे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी ते कामाला लागले आहेत. खैरेंच्या उमेदवारीस दानवे यांचा विरोध आहे. ते स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, राज्यात प्रचारासाठी तुमची गरज असल्याचे दानवे यांना 'मातोश्री'वरून सांगण्यात आले. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही दानवे यांची मनधरणी केल्याचे समजते.

विमानतळावरून का फिरले?
दानवे शुक्रवारी सायंकाळच्या विमानाने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मात्र, अचानक त्यांना 'मातोश्री'वरून बोलावणे आल्याने ते विमानतळावरूनच माघारी फिरले, दानवे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केला असल्याचे समजते.
महाविकास आघाडीतील एक बड़ा नेता एक- असल्याचे सूतोवाच पक्ष प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला. शिरसाटांचे ते विधान दानवे यांना उद्देशून असल्याची चर्चा आहे. दानवे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू समजले जातात. त्यांना खैरेंच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसभेला नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मी पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझ्यासाठी संघर्ष नवा नाही. भविष्यात काय घडेल हे आताच सांगू शकत नाही. 
- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
 

Web Title: Preparing for a big earthquake! Ambadas Danve angry with Chandrakant Khaire Candidacy; On the way to the Shinde group? efforts on Matoshree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.