आॅलिम्पिकची तयारी फक्त ३ कोटींमध्ये!
By admin | Published: March 19, 2016 01:56 AM2016-03-19T01:56:00+5:302016-03-19T01:56:00+5:30
टोकियो (जपान) येथे २०२०मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी राज्यातील खेळाडूंनी जास्तीतजास्त पदके मिळविण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Next
मुंबई : टोकियो (जपान) येथे २०२०मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी राज्यातील खेळाडूंनी जास्तीतजास्त पदके मिळविण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आगामी वर्षांत ही रक्कम खर्च केली जाणार आहे.
उच्च दर्जाच्या विविध क्रीडाविषयक सुविधा असलेले विभागीय क्रीडा संकुल शिंपोली; मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुरेसे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, एवढेच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेला तिच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत एक कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार
आहे. (विशेष प्रतिनिधी)