बुलेट ट्रेन बैठकीला तिनशे भूमिपुत्रांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 03:50 AM2017-06-07T03:50:39+5:302017-06-07T03:50:39+5:30

बुलेट ट्रेन संदर्भात चर्चा, माहिती आणि विचारविनिमय करण्यासाठी सोमावारी सकाळी ११ वाजता मान ग्रामपंचायत कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला ३०० भूमिपुत्रांची उपस्थिती होती

The presence of tensh nowhere in the bullet train meeting | बुलेट ट्रेन बैठकीला तिनशे भूमिपुत्रांची उपस्थिती

बुलेट ट्रेन बैठकीला तिनशे भूमिपुत्रांची उपस्थिती

Next

पंकज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन संदर्भात चर्चा, माहिती आणि विचारविनिमय करण्यासाठी सोमावारी सकाळी ११ वाजता मान ग्रामपंचायत कार्यालयात आयोजिलेल्या बैठकीला ३०० भूमीपुत्रांची उपस्थिती होती. ंहा प्रस्तावित लोहमार्ग पालघर तालुक्यातील कल्हाले, मान, बेटेगाव, पडघे या गावांतून जाणार असून त्याचे फायनल लोकेशन सर्व्हे आणि जिओटेक्निकल इनव्हीस्टीगेशन हे सर्व्हे लवकरच करण्या संदर्भात ही बैठक आयोजिली होती.
बैठकीला पालघरचे तहसीलदार महेश सागर आणि पश्चिम रेल्वे चे अधिक्षक अभियंता चंदन सिंह यांच्यासह बोईसरचे मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे मान ग्रामपंचायतीचे सरपंच मोरेश्वर दौडा, उप सरपंच अ‍ॅड. राहुल पाटील, माजी उप सरपंच जितेंद्र पाटील, तलाठी साधना चौहान, मान, बेटेगाव, आणि पडघा ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
जपान सरकरच्या मदतीने हा बुलेट ट्रेनचा महत्वकांक्षी प्रकल्प साकार होणार असून तो पूर्ण करण्याकरीता रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने सर्व्हे होणार आहे या रेल्वे मार्गाला साधारणत: १५ मीटर रुंद जागा लागणार असून जमीनीपासून ६ ते १० मीटर उंची वरु न बुलेट ट्रेन धावणार आहे. तर प्रत्येक १०० मीटर अंतरावर पिलर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी देऊन सर्व्हेला सहकार्य करण्याची विनंती केली. तर या बुलेट ट्रेनमुळे मुंबई अहमदाबाद या दोन्ही शहरा मधील अंतर कमी होणार आहे.
>प्रवास कालावधी ३ तास
सध्या या प्रवासाला आठ तास लागतात मात्र ही बुलेट ट्रेन साकार झाल्यावर याच प्रवासासाठी फक्त तीन तास लागणार आहेत. ताशी जास्तीत जास्त ३५० कि.मी. वेगाने ही ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर अशीच ट्रेन भारतातील प्रमुख शहराच्या दरम्यान सुरू करणारे प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याने तो महत्वाचा आहे.

Web Title: The presence of tensh nowhere in the bullet train meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.