खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करा; गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:51 AM2022-10-25T09:51:25+5:302022-10-25T09:52:15+5:30

या प्रकरणात 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालंच पाहिजे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे. 

Present the report of the Zoting Committee on Eknath Khadse Bhosari land to the Legislature; Girish Mahajan's demand to the Chief Minister | खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करा; गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करा; गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next

- प्रशांत भदाणे

जळगाव : भोसरी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. भोसरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

या प्रकरणात 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालंच पाहिजे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी घेतली आहे. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा त्यात खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल. खडसे जर शुद्ध असतील तर सर्व गोष्टी बाहेर यायला हव्या असेही गिरीश महाजन म्हणाले. 

भोसरी प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आलीये, न्यायालयाने या प्रकरणात लवकर चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुद्द्यावरून खडसे-महाजन यांच्यात वाकयुद्ध पेटलंय. दोन दिवसांपूर्वी खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढल्याची माहिती दिली होती. 

या प्रकरणात सरकार हे विरोधी पक्षाचे समर्थन करीत असल्याचे हे अनोखे उदाहरण आहे, असंही न्यायालयाने म्हटल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सत्तेच्या तालावर तपास यंत्रणा नाचत आहे, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचं खडसे म्हणाले होते.

Web Title: Present the report of the Zoting Committee on Eknath Khadse Bhosari land to the Legislature; Girish Mahajan's demand to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.