आघाडी सरकारची कामे जनतेसमोर मांडा

By admin | Published: August 5, 2014 02:56 AM2014-08-05T02:56:25+5:302014-08-05T02:56:25+5:30

सरकारने केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल़े तथापि, प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Present the works of the alliance government to the masses | आघाडी सरकारची कामे जनतेसमोर मांडा

आघाडी सरकारची कामे जनतेसमोर मांडा

Next
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होतील. अधिक जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह न्याय्य असल्याचा दावा करीत आघाडी सरकारने केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल़े तथापि, प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.  
अमरावती येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला़ तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात येत्या काही दिवसांत जागावाटपाबाबत चर्चा होईल. यातूनच अंतिम निर्णय होईल आणि तो आम्हाला मान्य असेल. तथापि, वेळ आली तर स्वतंत्र लढण्याचीही राष्ट्रवादीची तयारी असल्याचे ते म्हणाल़े लोकसभा निवडणुकीत मोदीलाट होती़ त्यामुळे काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याचे सांगून तटकरे म्हणाले, या लाटेचा प्रभाव आता ओसरला असून मतदारांनाही मोदी सरकारचा फोलपणा कळून चुकला आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभवाला मागे सारून जिद्दीने उभे राहिले पाहिजे. आघाडी सरकारने अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणो राबवल्या असून त्या लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकत्र्याना केल़े तसेच आपल्या कामांचे पुरेसे मार्केटिंग केले नाहीतर आताच्या काळात चालणार नाही. जे केले आहे, ते ठामपणो मांडलेच पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकत्र्याना दिला़ लोकसभा निवडणुकीतील पराभवाला काही अंशी अंतर्गत गटबाजीही कारणीभूत होती. ती आता खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल़े (प्रतिनिधी) 
 

 

Web Title: Present the works of the alliance government to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.