वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

By admin | Published: June 5, 2016 01:15 AM2016-06-05T01:15:28+5:302016-06-05T01:15:28+5:30

लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांनी सन २०१४ चा ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे शुक्रवारी राजभवन येथे सादर केला. या वेळी लोकआयुक्त म. ल. टहलियानी

Presenting the annual report to the Governor | वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

Next

मुंबई : लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांनी सन २०१४ चा ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे शुक्रवारी राजभवन येथे सादर केला. या वेळी लोकआयुक्त म. ल. टहलियानी, उपलोकायुक्त डॉ. शैलेशकुमार शर्मा उपस्थित होते.
या कार्यालयाकडे २०१४ या
वर्षात ७ हजार नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४० तक्रारी
या केवळ इतर प्राधिकाऱ्यांना
उद्देशून होत्या, तर काही स्वाक्षरीविरहीत असल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. २०१४ या वर्षात ५,८६० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत, तसेच मागील वर्षाच्या ४,८०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने एकूण १०, ६६७ प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ६,६८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Presenting the annual report to the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.