एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर

By admin | Published: February 24, 2015 04:27 AM2015-02-24T04:27:14+5:302015-02-24T04:27:14+5:30

उपनगरीय रेल्वेमार्गावर येत्या काळात एमयूटीपी-३ अंतर्गत आणखी काही मोठे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी यातील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर केले

Presenting to seven Railway Project Boards of MUTP-3 | एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर

एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर

Next

सुशांत मोरे, मुंबई
उपनगरीय रेल्वेमार्गावर येत्या काळात एमयूटीपी-३ अंतर्गत आणखी काही मोठे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी यातील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर केले असून, रेल्वे अर्थसंकल्पात त्यांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. या सात प्रकल्पांची एकूण किंमत ११ हजार ४४१ कोटी रुपये एवढी आहे.
एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आता एमयूटीपी-२ अंतर्गत अनेक प्रकल्पांचे काम केले जात आहे. यातील विविध प्रकल्प लवकरच मार्गी लावून एमयूटीपी-३ अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यावर विचार केला जात आहे. त्यासाठी एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प एमआरव्हीसीकडून नुकतेच रेल्वे बोर्डाकडे सादर केले असून, यात पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तिसरा आणि चौथा मार्ग यांसह स्थानकांचा विकास, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे तसेच नवीन डबे आणि लोकलची खरेदी अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे एमयूटीपी-३मधील विरार-वसई-दिवा-पनवेल नवीन मार्ग, हार्बरवरील गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत विस्तार, बोरीवली ते विरार पाचवा आणि सहावा मार्ग, कल्याण ते कसारा तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते कर्जत तिसरा आणि चौथा मार्ग या प्रकल्पांबाबत मात्र काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याऐवजी अन्य सात प्रकल्पांवरच विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Presenting to seven Railway Project Boards of MUTP-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.