मेकर टॉवरच्या अग्नितांडवात बजाज समूहाचे अध्यक्ष थोडक्यात बचावले
By admin | Published: October 18, 2016 09:47 AM2016-10-18T09:47:19+5:302016-10-18T11:09:58+5:30
कफ परेडच्या मेकर टॉवरमध्ये लागलेल्या अग्नितांडवात बजाज इलेक्टॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांचा संपूर्ण फ्लॅट भस्मसात झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - कफ परेडच्या मेकर टॉवरमध्ये लागलेल्या अग्नितांडवात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच टॉवरच्या 21व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीमध्ये बजाज इलेक्टॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांचा संपूर्ण फ्लॅट भस्मसात झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून शेखर बजाज आणि त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य, तसेच त्यांच्याकडे काम करणारी माणसे आगीमुळे फ्लॅटमध्ये अडकली होती. मात्र, या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती फायर ब्रिगेडच्या अधिका-यांनी दिली आहे. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर फायर ब्रिगेडच्या जवानांना भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आणखी बातम्या
21 व्या मजल्यावर आग लागल्याने सुरुवातीला आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने अग्नितांडव शमवायला सुरुवात केली. मात्र, आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे जरी स्पष्ट नसेल तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
In the Bajaj family flat, some family members & domestic help were stuck. All have been rescued without injury: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/7jH7nk7yHo
— ANI (@ANI_news) October 18, 2016
The flat that was gutted in Maker Tower in Cuffe Parade area in Mumbai belonged to Shekhar Bajaj (MD, Bajaj Electricals).
— ANI (@ANI_news) October 18, 2016