महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:24 AM2024-09-04T08:24:41+5:302024-09-04T08:26:08+5:30

 मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन ...

President Draupadi Murmu expressed confidence that Maharashtra's Lekki will make the country proud | महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राच्या लेकी देशाचा गौरव वाढवतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केला विश्वास

 मुंबई - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व' या ग्रंथाचे प्रकाशन तसेच 'उत्कृष्ट संसदपटू' व 'उत्कृष्ट भाषण' पुरस्कारांचा वितरण समारंभ मंगळवारी मुंबईतील विधिमंडळातील सभागृहात पार पडला. महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती मुर्मु यांनी केलं.

ही खूप आनंदाची बाब आहे की सध्याच्या काळात उपसभापती 
डॉ. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेतील महिला परंपरेला पुढे घेऊन जात आहे, तसेच ही महिला उपसभापती असणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. असे गौरव उद्गार यावेळी राष्ट्रपती मुर्मु यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याबद्दल काढले. या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थिती होते. 

 विधानसभा उत्कृष्ट संसदपटू : (२०१८-१९)   बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे, (२०१९-२०) प्रकाश आबिटकर, ॲड. आशिष शेलार, (२०२०-२१) अमित साटम, ॲड. आशिष जैस्वाल, (२०२१-२२)    संजय शिरसाट, प्रशांत बंब, (२०२२-२३) भरतशेठ गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार (२०२३-२४) रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते. 
 उत्कृष्ट भाषण : (२०१८-१९) नरहरी झिरवाळ, पराग अळवणी, (२०१९-२०) सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील, (२०२०-२१) प्रताप सरनाईक, प्रकाश सोळके, (२०२१-२२) सरोज अहिरे, सिध्दार्थ शिरोळे, (२०२२-२३)  यामिनी जाधव, अभिमन्यु पवार (२०२३-२४) कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.

विधानपरिषद उत्कृष्ट संसदपटू : (२०१८-१९) डॉ. नीलम गोऱ्हे, निरंजन डावखरे, (२०१९-२०) सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ, (२०२०-२१) प्रवीण दरेकर, विनायक मेटे, (२०२१-२२) अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत, (२०२२-२३) प्रसाद लाड, महादेव जानकर, (२०२३-२४) अमोल मिटकरी, गोपिचंद पडळकर, रमेशदादा पाटील. 
 उत्कृष्ट भाषण : (२०१८-१९) हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर, (२०१९-२०) रामहरी रुपनवार, श्रीकांत देशपांडे, (२०२०-२१) डॉ. मनिषा कायंदे, बाळाराम पाटील, (२०२१-२२) गोपिकिशन बाजोरिया, विक्रम काळे, (२०२२-२३) बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव, (२०२३-२४) आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनिल शिंदे.

Web Title: President Draupadi Murmu expressed confidence that Maharashtra's Lekki will make the country proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.