राष्ट्रपतिपदी हवी बिगर राजकीय व्यक्ती

By admin | Published: June 16, 2017 12:47 AM2017-06-16T00:47:02+5:302017-06-16T00:47:02+5:30

राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. मात्र या पदावर बिगर राजकीय

The President wants a non-political person | राष्ट्रपतिपदी हवी बिगर राजकीय व्यक्ती

राष्ट्रपतिपदी हवी बिगर राजकीय व्यक्ती

Next

- योगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. मात्र या पदावर बिगर राजकीय व देशभरात जिच्याकडे आदरयुक्त भावनेने पाहिले जाते, अशी व्यक्तीच विराजमान व्हावी, असा सूर संघ परिवारातून येत आहे.
राष्ट्रपतींच्या नावाला एकमुखी मान्यता मिळावी, असे रालोआतर्फे प्रयत्न सुरू आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येत मोट बांधली आहे. रालोआचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेकांची नावे समोर आली आहेत. यात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंह बादल, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उद्योगपती रतन टाटा, इतकेच काय तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचीदेखील चर्चा ‘सोशल मीडिया’वर रंगली आहे.
संघ वर्तुळात बहुतांश स्वयंसेवकांची अपेक्षा वेगळी आहे. राजकीय व्यक्ती राष्ट्रपतिपदी आली की वाददेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदावर निष्कलंक, समाजासाठी झटणारा व सर्वमान्य प्रतिमा असणारी व्यक्तीच हवी. रालोआने असा गैरराजकीय उमेदवार दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय समीकरणे लक्षात घेता राजकीय उमेदवार द्यावाच लागला तर संबंधित व्यक्ती प्रामाणिक, वादापासून दूर व समाजात आदर प्राप्त केलेली हवी, अशी संघाच्या राष्ट्रीय पातळीवर सदस्यांचीदेखील भावना आहे.
राष्ट्रपतिपदाचा रालोआचा उमेदवार कोण असेल हे संबंधित पक्ष ठरवतीलच. संघाचा तो विषय नाही. मात्र या पदावर प्रामाणिक, सर्वमान्य व पात्र व्यक्ती हवी ही अपेक्षा आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रूपाने एक ‘व्हिजनरी’ राष्ट्रपती लाभले होते. त्यांच्यासारखीच समर्पित व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाली तर देशाचा गौरव वाढेल, असे मत संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

Web Title: The President wants a non-political person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.