जनताच निवडणार आता नगराध्यक्ष!

By admin | Published: May 11, 2016 04:25 AM2016-05-11T04:25:20+5:302016-05-11T04:25:20+5:30

नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे.

The President will choose the President! | जनताच निवडणार आता नगराध्यक्ष!

जनताच निवडणार आता नगराध्यक्ष!

Next

मुंबई : नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. याशिवाय, नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षांच्या निवडीत एरवी होणारा घोडेबाजार रोखला जाणार आहे. भाजपाने राजकीय फायद्याचे गणित म्हणूनही हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.
राज्यात २००१ ते २००६ या काळात थेट नगराध्यक्ष निवडून देण्याची पद्धत होती. त्या काळात राज्यात आघाडीचे सरकार असले तरी नगराध्यक्ष निवडीत भाजपाला चांगले यश मिळाले होते. आता ही पद्धत पुन्हा आणल्यास पक्षाला फायदा होईल, असा अहवाल प्रदेश भाजपाकडून देण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अनेकांशी चर्चा करून थेट नगराध्यक्षांची पद्धत आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. सध्या नगरपालिकांमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा हेतू यामागे असल्याचेही सांगितले जाते. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पापैकी २५ टक्के रक्कम खर्च करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना असेल. चालू वर्षाअखेर १९५ नगरपालिकांची निवडणूक नवीन निर्णयानुसार होणार आहे.
मुंबईमध्ये सध्याची प्रभाग (एक वार्ड) पद्धत कायम राहणार आाहे. मात्र, अन्य महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असेल. त्यामुळे प्रभागातून निवडून येण्यासाठी संबंधित नगरसेवकास चार वॉर्डांमधून लोकप्रियता सिद्ध करावी लागेल.
असा आहे इतिहास
विलासराव देशमुख आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना २००१मध्ये थेट नगराध्यक्षाची पद्धत आणली गेली. २००६मध्ये विलासरावांनीच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची पूर्वीचीच पद्धत लागू केली. लातूरमध्ये बहुमत काँग्रेसचे पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रा. जनार्दन वाघमारे असे चित्र होते. ही बाब जिव्हारी लागल्यानेच देशमुख यांनी पूर्वीची पद्धत आणली असे म्हटले गेले. (विशेष प्रतिनिधी)
>या पद्धतीचे तोटे
नगराध्यक्ष एका पक्षाचा
आणि न.प.मध्ये बहुमत दुसऱ्या पक्षाचे असेल तर शहराच्या विकासकामांना खीळ बसू शकते.
> शहरातील लोकप्रिय व्यक्तीला
संधी मिळते. त्यामुळे प्रभावीपणे काम करता येते.नगरसेवकांमधून नगराध्यक्ष
निवडताना घोडेबाजार होतो. त्या प्रकारांना आळा बसतो. ५ वर्षे एकच नगराध्यक्ष असल्याने स्थैर्य प्राप्त होते.
>नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग असेल. याचा अर्थ दोन वॉर्ड हा नगरसेवकाचा मतदारसंघ असेल.
सध्या एका वॉर्डातून निवडून यावे लागते. आता दोन वॉर्डांमध्ये लोकप्रियता सिद्ध करावी लागणार आहे.

Web Title: The President will choose the President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.