Babanrao Lonikar : माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं, त्यांचं मत बाद करा - बबनराव लोणीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:43 AM2022-07-18T11:43:42+5:302022-07-18T11:52:50+5:30

BJP Babanrao Lonikar And Congress Nitin Raut : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसच्या नितीन राऊत यांचं मत बाद करा अशी मागणी केली आहे.

Presidential Election 2022 BJP Babanrao Lonikar objection on Congress Nitin Raut voting | Babanrao Lonikar : माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं, त्यांचं मत बाद करा - बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar : माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं, त्यांचं मत बाद करा - बबनराव लोणीकर

googlenewsNext

देशातील सुमारे ४८०० आमदार, खासदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करत आहेत. त्याद्वारे १५ व्या राष्ट्रपतीची निवड केली जाईल. या निवडणुकीत एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांतर्फे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे रिंगणात आहेत. एकूण मतांपैकी ६० टक्क्यांहून अधिक मते मिळून द्रौपदी मुर्मू विजयी होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे याच दरम्यान भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी (Babanrao Lonikar) काँग्रेसच्या नितीन राऊत (Nitin Raut) यांचं मत बाद करा, अशी मागणी केली आहे. "माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं" असा आक्षेप लोणीकरांनी घेतला आहे. 

बबनराव लोणीकर यांनी "माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. नितीन राऊत हे अर्धा तास मध्ये जाऊन बसले. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी पहिलं मतदान केलं. त्यांना मध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळं त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. या संदर्भातील फुटेज देखील आहेत" असं म्हटलं आहे. एबीपी माझाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी २१ जुलै रोजी संसद भवनामध्ये केली जाईल. तसेच नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी आपल्या पदाची शपथ घेतील.

प्रादेशिक पक्षांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

प्रादेशिक पक्षांनी मुर्मू यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएकडे आता ६.६७ लाख मते आहेत. मुर्मू यांना बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, अण्णाद्रमुक, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष, जनता दल (सेक्युलर), शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना दोन तृतीयांश मते मिळण्याची शक्यता आहे.

उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा

मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी गोव्याच्या १७ व्या राज्यपाल, गुजरातच्या २३व्या राज्यपाल, राजस्थानच्या २०व्या तर उत्तराखंडच्या चौथ्या राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. त्या माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस पक्षाच्या माजी सरचिटणीस आहेत. मार्गारेट अल्वा (८० वर्षे) या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ विरोधी पक्षांच्या रविवारी झालेल्या बैठकीत अल्वा यांच्या उमेदवारीबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. याआधी भाजपप्रणीत एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची उमेदवारी या निवडणुकीसाठी निश्चित केली आहे.

Web Title: Presidential Election 2022 BJP Babanrao Lonikar objection on Congress Nitin Raut voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.