राज्यातील ६८ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर; सीआरपीएफचे सुनील काळे यांचा मरणोत्तर गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 07:04 AM2021-08-15T07:04:17+5:302021-08-15T07:05:23+5:30
President's Medal : केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ जाहीर झाले तर उर्वरित ६७ अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत.
मुंबई : पोलीस दलात शौर्यपूर्ण, उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्रातील ६८ पोलीस अधिकारी - अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे, मुंबईतील उपायुक्त मंजुनाथ शिंगे, सहायक आयुक्त वासंती रासम, निरीक्षक चिमाजी आढाव आदींचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने त्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ जाहीर झाले तर उर्वरित ६७ अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. त्यात गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त डुंबरे, नाशिक ग्रामीणचे उपनिरीक्षक अशोक अहिरे व यवतमाळचे उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.
अन्य विजेत्यांची नावे
पोलीस शौर्य पदक विजेते :
मंजुनाथ शिंगे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ - ८, मुंबई), अतिरिक्त अधीक्षक हरी बालाजी एन., सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, नवनाथ ढवळे, हवालदार लिंगनाथ पोर्टट, कॉन्स्टेबल मोरेश्वर वेलाडी, बिच्छू सिदम, श्यामसे कोडापे, नीतेश वेलाडी, कॉन्स्टेबल प्रवीण कुलसम, सडवली आसम, उपनिरीक्षक योगेश पाटील, सुदर्शन काटकर, हवालदार रोहिदास निकुरे, आशीष चव्हाण, पंकज हलामी, आदित्य मडावी, रामभाऊ हिचामी, मोगलशाह मडावी, ज्ञानेश्वर गावडे, एपीआय राजेंद्रकुमार तिवारी, विनायक आटकर व ओमप्रकाश जामनिक, कॉन्स्टेबल सुरेंद्रकुमार मडावी व शिवा गोरले.
प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस पदक विजेते
सहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम (डी. एन. नगर विभाग, मुंबई), मधुकर सतपुते (औरंगाबाद), शेखर कुऱ्हाडे (तांत्रिक मोटर वाहतूक विभाग, मुंबई), सुरेंद्र देशमुख (गुन्हे शाखा, पुणे शहर), ललित मिश्रा (नागपूर), मधुकर सावंत (गुप्त वार्ता विभाग, मुंबई) पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव (भायखळा, मुंबई), राजेंद्र राऊत (अमरावती), संजय निकुंबे, (खेरवाडी, मुंबई), दत्तात्रय खंडागळे (फोर्स वन, गोरेगाव), कल्याणजी घेटे,
वाहतूक शाखा, ठाणे शहर सहायक पोलीस निरीक्षक, नितीन दळवी
(गुन्हे शाखा, मुंबई) मोतीराम मडवी (इंटेलिजन्स सेल, गडचिरोली), उपनिरीक्षक उल्हास रोकडे (डीजीपी कार्यालय, कुलाबा), सुनील तावडे (उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई), सुरेश पाटील (गुन्हे शाखा, मुंबई शहर), हरिश्चंद्र ठोबरे, उपनिरीक्षक (गुप्त वार्ता विभाग, मुंबई), संजय सावंत (रिडर ब्रॅंच, रायगड), संतोष जाधव, (प्रशिक्षण केंद्र, ननवीज दौंड, पुणे), सहायक फौजदार पोपट आगवणे (विशेष शाखा - १, मुंबई), बाळू कानडे (जिल्हा विशेष शाखा, औरंगाबाद ग्रामीण), विष्णू रकडे (एसीबी औरंगाबाद), सुभाष बुरडे (मुख्यालय नागपूर ग्रामीण), विजय भोसले, पॉलराज अँथनी (दोघे विशेष शाखा, पुणे शहर.)
सोलापूरच्या वीरपुत्राचा मरणोत्तर सन्मान : गेल्या वर्षी जून महिन्यात पुलवामा येथे हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान सुनील काळे शहीद झाले होते. सोलापूरच्या या वीरपुत्राला मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले.