प्रा. वामन केंद्रे यांना एनएसडीचा ब. व. कारंथ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 09:51 AM2019-03-05T09:51:37+5:302019-03-05T11:00:45+5:30
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रोख रूपये एक लाख, सम्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीच्यावतीने सदर पुरस्कार हा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान व्हावा या हेतुने एनएसडीचे पूर्व संचालक व भारतीय रंगभूमीवरील कलावंत ब.व.कारंथ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्या नावाने 2004 या वर्षापासून दिला जात आहे. वामन केंद्रे यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरील कार्य अजोड आहे. वामन केंद्रे एनएसडी चे संचालक असताना 2018 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामघ्ये जगातील सर्वात मोठा नाट्यसमरोह महणजेच “8 वे थिएटर ऑलम्पिक्स” मोठ्या दिमाखात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. एवढ्या मोठ्या स्तरावर असा महोत्सव आयोजित करण्याचा मान भारताला पहिल्यांदाच मिळाला. त्यांच्या या कार्याचा गौरव संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगभरातून केला गेला.
पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या माजी मात्तबर कलाकराला हा पुरस्कार दिला जातो. तर पन्नास वर्षाखालील माजी गुणी युवा विद्यार्थ्याला मनोहर सिंग स्मृती पुरस्कार ही दिला जातो. हा पुरस्कार 2004 रोजी वामन केंद्रे यांना मिळाला होता. वामन केंद्रे हे उपरोक्त दोन्ही पुरस्कार मिळवणारे एनएसडीच्या इतिहासातील पहिले कलावंत ठरले आहेत. मनोहर सिंग स्मृती पुरस्कार हा आपल्या युवा माजी विद्यार्थ्यांच्या कामाचा सन्मान व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे अशी एनएसडीची त्यामागची भावना आहे. हा पुरस्कार यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे वितरीत केला जाणार आहे.