तणावामुळे प्रतिबंधात्मक आदेश १० मार्चपर्यंत

By Admin | Published: March 2, 2017 12:59 AM2017-03-02T00:59:12+5:302017-03-02T00:59:12+5:30

पोलीस सह आयुक्त सुनील रामानंद यांनी १० मार्चपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला

Prevention of Tension by March 10 | तणावामुळे प्रतिबंधात्मक आदेश १० मार्चपर्यंत

तणावामुळे प्रतिबंधात्मक आदेश १० मार्चपर्यंत

googlenewsNext


पुणे : ईव्हीएम यंत्रांविरुद्धच्या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सह आयुक्त सुनील रामानंद यांनी १० मार्चपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार मोठ्याने घोषणा देणे, मिरवणूक काढणे, भाषण करणे, अविर्भाव करणे, सभा घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक १० मार्च रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये यानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, पुढाऱ्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नीतीमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, असे वर्तन करणे यास मनाई करण्यात आली आहे़

Web Title: Prevention of Tension by March 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.