अद्रकाचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:15 AM2018-10-06T11:15:24+5:302018-10-06T11:15:50+5:30
पाण्याअभावी अद्रकाची आवक कमी झाल्याने औरंगाबादेत क्विंटलमागे ३ हजार रुपयांनी अद्रकाचे दर वाढले आहेत.
पाण्याअभावी अद्रकाची आवक कमी झाल्याने औरंगाबादेत क्विंटलमागे ३ हजार रुपयांनी अद्रकाचे दर वाढले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे अन्य फळभाज्यांचे भावही हळहळू वाढू लागले आहेत.
औरंगाबाद जिल्हा अद्रकाचा गड मानला जातो. मध्यंतरी देशभरातून अद्रकाची मागणी घटली होती. भाव घटून ५५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्वंटल अद्रक विक्री झाले; मात्र पावसाने मोठा खंड दिल्याने अनेकांनी अद्रकाची लागवड कमी केली. परिणामी, आठवडाभरात ३ हजार रुपयांनी भाववाढ होऊन शुक्रवारी ८५०० ते ९ हजार रुपये प्रतिक्विं टलपर्यंत अद्रक विक्री झाले; मात्र मागणीअभावी ७०० ते १५०० रुपये क्विं टलने लसणाची विक्री होत आहे. नवीन कांदा ठोकमध्ये ५ ते ७ रुपये, तर जुना कांदा ८ ते १२ रुपये किलोेने विकत आहे. बटाटा ठोक बाजारात १६ ते १७, तर किरकोळ विक्रीत २५ रुपये प्रतिकिलो आहे.