नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले

By admin | Published: June 8, 2017 06:29 AM2017-06-08T06:29:21+5:302017-06-08T06:29:21+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तब्बल ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली.

The price of vegetables in the market committee in Navi Mumbai has collapsed | नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले

नवी मुंबईत बाजार समितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तब्बल ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली. अचानक आवक वाढल्याने होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव गडगडले. होलसेल मार्केटमध्ये कोबी ६ ते ८ व फ्लॉवर ५ ते ७ रुपये किलो दराने विकला जात होता. हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून आंदोलन सुरू असतानाच भाव गडगडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होवू लागले असून शासनाने हमीभावाचे दिलेले आश्वासन खोटे ठरू लागले आहे.
३ जूनला समितीमध्ये कृषी मालाचे भाव अचानक वाढले. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो ३६ ते ४०, कोबी १६ ते २४ व फ्लॉवर २४ ते ३० रुपये किलो दराने विकला जात होता. बुधवारी अचानक मार्केटमध्ये ६५७ ट्रक, टेंपोची आवक झाली व बाजारभाव गडगडले. कोबी, फ्लॉवरचे दर तीन पट कमी झाले असून टोमॅटोच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दुपारनंतरही शेतकऱ्यांच्या मालाची पूर्णपणे विक्री झाली नाही. यामुळे शिल्लक माल गुरुवारी अजून कमी भावाने विकावा लागणार आहे.
संपामुळे परराज्यातून आलेल्या मालाला चांगला भाव मिळाला. परंतु राज्यातील शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात करताच परत भाव गडगडले आहेत. होलसेल मार्केटमध्ये भाव कमी झाले असले तरी किरकोळ विक्रेत्यांकडून लुबाडणूक सुरूच आहे. किरकोळ मार्केटमध्ये ८० ते १०० रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे.
वस्तू३ जून ७ जून
टोमॅटो३६ ते ४०९ ते १३
कोबी१६ ते २४६ ते ८
फ्लॉवर२४ ते ३०५ ते ७
कारली१४ ते २४२२ ते २४
वांगी१६ ते २८१० ते २४
ढोबळी मिरची४० ते ५०२२ ते २६
भेंडी३० ते ३४२६ ते ३०
शेवगा२८ ते ३६१८ ते २२
तोंडली२६ ते ३६१२ ते ३४
टोमॅटो३६ ते ४०९ ते १३

Web Title: The price of vegetables in the market committee in Navi Mumbai has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.