गोव्यात केपे गणोशोत्सवात आलिशान गाड्यांची बक्षीसे
By Admin | Published: September 3, 2016 08:17 PM2016-09-03T20:17:48+5:302016-09-03T20:17:48+5:30
मडगावपासून 16 किलोमीटरवरील दक्षिण गोव्यातील केपे या छोटय़ाशा गावात सार्वजनिक गणोशोत्सव प्रसिध्द आहे तो देखाव्यांसाठी नव्हे तर या लॉटरींच्या बक्षिसांसाठी
>- सुशांत कुंकळयेकर / ऑनलाइन लोकमत
मडगाव (दक्षिण गोवा), दि. 3 - वास्तविक सार्वजनिक गणोशोत्सव प्रसिध्द असतात ते तेथे तयार केलेल्या देखाव्यांसाठी. मात्र, मडगावपासून 16 किलोमीटरवरील दक्षिण गोव्यातील केपे या छोटय़ाशा गावात सार्वजनिक गणोशोत्सव प्रसिध्द आहे तो देखाव्यांसाठी नव्हे तर या लॉटरींच्या बक्षिसांसाठी. कोटय़वधी रुपयांच्या चार चाकींच्या या बक्षिसांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या गणोशोत्सवाकडे वेधले जाते.
35 लाखांची बीएमडब्ल्यू प्रेस्टीज, 30 लाखांची ह्युंडाय सांता फे, 27 लाखांची हर्ली डेव्हिन्सन ब्रेकआउट अशा एकसे बढकर एक 9 चार चाकी आणि एक दुचाकी अशी बक्षिसे केपे गणोशोत्सव पुन्हा एकदा आकर्षण ठरला आहे. तब्बल सव्वाकोटी किमतीच्या गाडय़ा हे या उत्सवाचे आकर्षण आहे.
या गाडय़ांसंदर्भात जो कर भरायचा आहे तोही मंडळच उचलत असल्याने या मंडळाच्या लॉटरीवर लोकांच्या उडय़ा पडत आहेत. लॉटरीतून आलेल्या पैशांवर गणोशोत्सवाचे आयोजन करण्याची ही परंपरा केपे गणोशोत्सव मंडळाने अगदी पहिल्या वर्षापासून म्हणजे 1988 पासून सुरू केली होती. वास्तविक लॉट:यांच्या पैशांतून गणोशोत्सव साजरा करण्याची परंपरा गोव्यातील आद्य गणोशोत्सव मंडळ असलेल्या मडगाव गणोशोत्सव मंडळाने सुरू केली होती. या मंडळाने बक्षीसरूपात ठेवलेल्या चारचाकी गाडीने सर्वाचे लक्ष वेधले होते. याच मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवून केपे गणोशोत्सव मंडळानेही ही परंपरा सुरू केली. आता मडगावचे गणोशोत्सव मंडळ या बाबतीत कधीचेच मागे पडले असून आता त्याची जागा केपेच्या या मंडळाने घेतली आहे.
या मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप शिरवईकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, 1988 मध्ये या मंडळाने लॉटरी बक्षिसांच्या रूपात कायनेटिक होंडाने सुरुवात केली. 1989 मध्ये लॉटरीचे बक्षीस म्हणून मारुती 800 ही चारचाकी गाडी पहिल्यांदा ठेवली. असे जरी असले तरी 2008 पासून ख:या अर्थाने या लॉटरींनी जम घेतला. आज हे मंडळ उत्सवासाठी दोन कोटी रुपयांच्या लॉटरी बाजारात आणतात. मात्र, या लॉटरी अवघ्या 10 ते 15 दिवसांत संपतात.
मागच्या वर्षी या मंडळाने प्रथमच हर्ली डेव्हीन्सनची स्पोर्ट्स बाईक बक्षीसरूपात ठेवली होती. यामुळे या लॉट:यांकडे युवा मंडळी आकर्षित झाली होती. या लॉट:यांवर युवा मंडळींच्या उडय़ा पडल्याने अवघ्या चार दिवसांत दोन कोटींच्या लॉट:या संपल्या होत्या. त्यामुळे यंदाही या बक्षिसांच्या ताफ्यात हर्ली डेव्हीन्सनची ब्रेकआउट ही 27 लाखांची स्पोर्ट्स बाईक बक्षीस म्हणून ठेवली आहे.
पारदर्शी निकाल
सर्व लोकांच्या समोर पारदर्शकपणो हा निकाल जाहीर केला जातो. त्यात कोणत्याही प्रकारचा खोटारडेपणा नसल्यानेच मंडळाच्या या लॉटरींना लोकांची मागणी असते, असे प्रदीप शिरवईकर म्हणाले. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तीन महिने आपले सर्व काम विसरून या उत्सवाच्या कार्याला वाहून घेतात, असे ते म्हणाले.
केपे गणोशोत्सवाच्या लॉटरीची महती अगदी विधानसभेतही पोहचली आहे. या लॉट:या बाजारात आल्यावर विधानसभेतील आमदारही या लॉट:या विकत मिळाव्यात यासाठी जवळच्या आमदारांना गळ घालतात. किमान 10 लॉट:या तरी आपल्याला मिळाव्यात यासाठी आमदारांमध्येही चढाओढ लागलेली असते.
- सुभाष फळदेसाई, आमदार, सांगे मतदारसंघ