हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे भाव तेजीत

By admin | Published: June 9, 2016 01:42 AM2016-06-09T01:42:00+5:302016-06-09T01:42:00+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत निघाले.

Prices of gram, tomatoes, coriander | हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे भाव तेजीत

हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे भाव तेजीत

Next


दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, टोमॅटो, कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत निघाले. तर, मिरचीच्या आवकेत घट होऊन बाजारभाव स्थिर निघाले. वांगी, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर असून, बाजारभाव स्थिर आहेत. गहू, ज्वारी, बाजरी, मका या मालाची आवक स्थिर झाली असून, बाजारभाव स्थिर आहेत. लिंबाच्या आवक कमी होऊन बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफएक्यू) (१६४) १६०० ते २२००, ज्वारी (२१) १६०० ते २०००, बाजरी (५) १८१४ ते २०००, हरभरा (२२) ५९०० ते ५९१४, मूग (१२) ६८०० ते ७०००, लिंबू (९) ४००-१०००.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (४५३) १६५० ते २३००, ज्वारी (७९६) १६०० ते २५००, बाजरी (१४९) १५०० ते २०००, हरभरा (१०२) ५९०० ते १७००,चवळी (२५) ७४०० ते ८४५०, लिंबू (२५) ५५०-१४१०.
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (१०) १६०० ते २०००, ज्वारी (५) २००० ते २१००, बाजरी (२७) १४०० ते २४११, हरभरा (१४) ५७०० ते ५८००, मका (७) १६०० ते १६००, चवळी (२) ८००० ते ८०००.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (४५) १६८१ ते २३५१, ज्वारी (९) १५०० ते २२००, बाजरी (८) १९५१ ते २०५१, हरभरा (१०) ५५०० ते ५७००, लिंबू (१६) ६०० ते ११५०.(वार्ताहर)
>दौंड येथे भाजीपाल्याची आवक : (१० किलोंप्रमाणे) टोमॅटो (२५) ३००-५१०, वांगी (११) ३००-५१०, दोडका (४) २२०-३४०, भेंडी (११) १५०-३६०, कार्ली (४) २५०-४५०, हिरवी मिरची (१९) ३०० ते ५००, भोपळा (२५) ५० ते १३०, काकडी (२५) ७० ते १७०, काकडी (२५) ६० ते १४०, कोथिंबीर (९,८७० जुड्या) ३०० ते १,२००, मेथी (५,४०० जुडी) ४००-७००.

Web Title: Prices of gram, tomatoes, coriander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.